पुणे - जिल्ह्यातील पाबळ येथील जैन गोशाळेत दुष्काळी परिस्थितीत अनेक जनावरांना आश्रय देण्यात आला. मात्र, सध्या अर्धा पावसाळा संपला आहे. तसेच सर्वत्र मुबलक चारा देखील उपलब्ध झाला आहे. मात्र, ही जनावरे आताही ७५० गोशाळेतच आहेत. शेतकऱ्यांनी या जनावरांकडे पाठ फिरवली आहे.
पावसाळ्यात पाबळ जैन गोशाळेत ७५० जनावरांचे संगोपन - पाबळ जैन गोशाळेत
पाबळ जैन गोशाळेत जनावरांना मोठा आधार दिला. दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध करून दिला. मात्र, सध्या सर्वत्र मुबलक चारा असतानाही आज या जनावरांना आपले आयुष्य गोशाळेतच काढावे लागत आहे.
शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करत असतो. जनावरे दूध देतात तोपर्यंत त्याचे संगोपन चांगले केले जाते. मात्र, त्यानंतर जनावर भाकड झाले की त्याकडे दुर्लक्ष करून त्याची विक्री केली जाते. अशा जनावरांना पाबळ येथील गोशाळेमध्ये आश्रय दिला जातो. अशाचप्रकारे उत्तर पुणे जिल्ह्यात दुष्काळ पसरला असताना जनावरांचे चाऱ्यांवाचून मोठे हाल होत होते. त्यावेळी पाबळ येथील जैन गोशाळेने या जनावरांना मोठा आधार दिला. दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध करून दिला. मात्र, सध्या सर्वत्र मुबलक चारा असतानाही आज या जनावरांना आपले आयुष्य गोशाळेतच काढावे लागत आहे.