पुणे - शहरात 28 एप्रिलला दुपारी चार वाजेपर्यंत 75 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने बाधित एकूण रुग्णांची संख्या 1423 झाली आहे. आतापर्यंत शहरात 210 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर एकूण 81 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरात दुपारी चार वाजेपर्यंतच्या अहवालानुसार एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1128 आहे. पुणे विभागाचा विचार केला तर एकूण 1553 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, यात 1232 अॅक्टिव्ह रुग्ण असून 89 जणांचा मृत्यू झाला आहे.