महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 11, 2020, 12:09 PM IST

Updated : Jan 11, 2020, 2:24 PM IST

ETV Bharat / state

भाजी विक्रीसाठी वापरली जातेय 'ही' अलिशान गाडी; ७० वर्षीय आजीची अनोखी शक्कल

एका आलिशान मोटारीतून एक ७० वर्षीय आजी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. सुमन निवृत्ती भरणे असे या आजीचे नाव आहे. सुमन भरणे यांना त्यांचा मुलगा संदीप हे मदत करतात.

भाजी विक्रीचा व्यवसाय
भाजी विक्रीचा व्यवसाय

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात एका आलिशान मोटारीतून एक ७० वर्षीय आजी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. सुमन निवृत्ती भरणे असे या आजीचे नाव आहे. सुमन भरणे यांना त्यांचा मुलगा संदीप हे मदत करतात. दररोज किमान पाच हजार रुपयांचा व्यवसाय हे माय-लेक करतात.

सुमन भरणे या पहाटेच शेतात जातात. सुनांच्या मदतीने शेतातील ताजी भाजी आणून स्वच्छ करून घेतात. त्यानंतर सायंकाळी इनोव्हा गाडीतून शहरातील सांगवी, औंध, पाषाण, हिंजवडी या ठिकाणी भाजी विकण्यासाठी जातात. सुरुवातीला त्या टेम्पोमधून भाजी विकत. कालांतराने त्यांच्या मुलाने टेम्पो विकून इनोव्हा घेतली.

हेही वाचा - राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालयाला १०० वर्ष पूर्ण; मात्र, जागेअभावी दुर्मिळ वस्तू नागरिकांच्या दृष्टीआड

सुमन भरणे मागील तीस वर्षांपासून शेती व्यवसाय करतात. त्याच्या सोबत भाजीविक्रीही करतात. भरणे कुटुंबात ऐकून १५ सदस्य आहेत त्यांच्या सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह भाजीपाल्यावरच चालतो. योग्य पद्धतीने शेती केली तर त्यातून नक्कीच फायदा होतो. शेतकरी असल्याचा अभिमान आहे, असे संदीप भरणे यांनी सांगितले.

आलिशान मोटारीतून भाजी विक्रीचा व्यवसाय

भरणे कुटुंबीय आपल्या 15 एकर शेतीमध्ये मेथी, कोथिंबीर, पालक, मुळा यासारख्या भाज्यांचे उत्पादन घेतात. सेंद्रिय खतांचा वापर करून पिकवलेल्या ताज्या भाजीपाल्याला ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सुमन भरणे यांनी सांगितले.

Last Updated : Jan 11, 2020, 2:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details