पुणेदारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून 20 वर्षीय नातवाने क्रिकेट खेळायच्या बॅटने डोक्यात वार करीत आजोबांचा खून केला Grandson has Killed his Grandfather आहे. पुण्यातील भोर तालुक्यातील आपटी गावात ही धक्कादायक घटना घडली Crime at Apti Village in Pune आहे. या घटनेतील आरोपी प्रथमेश पारठे हा पळून जाण्याच्या तयारीत असताना भोर बसस्थानकातून पोलिसांनी त्याला Bhor Police Arrested Accused अटक केली आहे. अधिक तपास भोर पोलीस स्टेशनच्या Bhor Police Station कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे.
बॅटने आजोबांच्या डोक्यात सपासप वार भोर तालुक्यातील आपटी गावात राहणाऱ्या आरोपी प्रथमेश पारठे याने आजोबा नथू पारठे वय 70 हे घराच्या अंगणात बसलेले असताना यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, आजोबांनी प्रथमेशला पैसे देण्यास नकार दिला. नकारानंतर चिडलेल्या आरोपीने जवळच असलेल्या क्रिकेट खेळायच्या बॅटने आजोबांच्या डोक्यात सपासप वार केले. यात जखमी झालेल्या नथू पारठे यांचा जागीच मृत्यू झाला.