महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून पुणे विभागासाठी 7 हजार ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन उपलब्ध - Pune corona news

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने जेनेटीक लाईफ सायन्सेस प्रा.ली. वर्धा या कंपनीने 50 हजार ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन महाराष्ट्रासाठी उपलब्ध करून दिले असून पुणे विभागासाठी कंपनीकडून गुरुवारी पाच हजार ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन देण्यात आले आहेत.

पुणे कोरोना न्यूज
नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून पुणे विभागासाठी 7 हजार ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन उपलब्ध

By

Published : Jun 10, 2021, 7:33 PM IST

पुणे - जिल्ह्यासह राज्यात गेल्या काही आठवड्यापासून म्यूकरमायकोसीसचे रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णांवर उपचार केले जात असले तरी उपचारासाठी वापरण्यात येणा-या ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शनची कमतरता भासत होती. ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने जेनेटीक लाईफ सायन्सेस प्रा.ली. वर्धा या कंपनीने 50 हजार ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन महाराष्ट्रासाठी उपलब्ध करून दिले असून पुणे विभागासाठी कंपनीकडून गुरुवारी पाच हजार ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन देण्यात आले आहेत.

म्यूकरमायकोसीस आजारात महत्वाचे समजले जाणाऱ्या ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शनचा तुटवडा जाणवत होता. यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्याचाच भाग
म्हणून आज हे इंजेक्शन पुणे विभागाला देण्यात आले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आज जेनेरिक लाईफ सायन्सेस प्रा.ली. वर्धा या कंपनीचे संचालक डॉ. महेंद्र क्षिरसागर यांनी पाच हजार ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन सुपूर्त केले. येत्या आठवडयात पुणे विभागसाठी आणखी दोन हजार ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. म्यूकरमायकोसीसच्या रुग्णांसाठी हे इंजेक्शन दिलासा देणारे ठरेल, असा विश्वास यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details