पुणे - पुणे जिल्ह्यातील चाकण येथील अवैध धंद्यांवर गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने धडक करावाई केली. यात तब्बल ७ लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. तर दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 मे रोजी गुन्हे शाखा युनिट 3 चे अधिकारी व कर्मचारी कोविड 19 संदर्भात संचारबंदीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत होते. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास चाकण पोलीस ठाणे हद्दीत काळूस गावच्या परिसरात, भामा नदीच्या काठावर उत्तरसिंग राजकुमार राठोड हा भट्टी लावून गावठी दारु काढत आहे, अशी बातमी मिळाली. या पथकातील अधिकारी व स्टाफने या ठिकाणी जाऊन छापा टाकला. तेवढ्यात तेथील एकजण पोलीस आल्याची चाहूल लागताच पळून गेला. तेथे 5,00,000 रुपये किमतीचे एकूण 10 हजार लिटर कच्चे रसायन, दारू काढण्यासाठी लागणारी साधने आढळून आली. ते सर्व जागीच नष्ट केले. तसेच, उत्तरसिंग राजकुमार राठोड (रा. काळूस ता.खेड जि.पुणे) याच्याविरुद्ध चाकण पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी एका ठिकाणी कारवाई