पुणे- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात 21 दिवसांचे लाॅकडाऊन लागू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद आहेत. शहरातील कामधंदे बंद पडले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कामगारांचे स्थलांतर वाढले आहे. अशा स्थलांतरीत कामगारांची पुणे विभागात सोय करण्यात आली आहे.
लाॅगडाऊन: पुण्यात 65 हजार स्थलांतरीत कामगारांची सोय... - कोरोना व्हायरस बातमी
पुणे विभागात आलेल्या 65 हजार 200 स्थलांतरित मजुरांची सोय करण्यात आली आहे. 1 लाख 19 हजार मजुरांना जेवण देण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा-COVID-19 : भारताने गाठला चार हजार रुग्णांचा टप्पा; बळींची संख्याही शंभरहून अधिक..
पुणे विभागात आलेल्या 65 हजार 200 स्थलांतरित मजुरांची सोय करण्यात आली आहे. 1 लाख 19 हजार मजुरांना जेवण देण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 116 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 574 कॅम्प असे पुणे विभागात एकूण 690 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 65 हजार 200 स्थलांतरित मजूर असून 1 लाख 19 हजार 480 मजुरांना भोजन देण्यात येत आहे.