पुणे - वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वृद्धाने 13 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली असून सुनील रानडे (वय- 65) असे मृत जेष्ठ नागरिकाचे नाव आहे. अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.
वाकडमध्ये ज्येष्ठ नागरिकाची 13 व्या मजल्यावरून उडी ; आत्महत्येचे कारण अस्पष्ट - old citizens suicide in pune
वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वृद्धाने 13 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली असून सुनील रानडे (वय- 65) असे मृत जेष्ठ नागरिकाचे नाव आहे. अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना देवताळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारे रानडे हे रहाटणी येथे फ्लॅट बघण्यासाठी गेले होते. त्यांना फ्लॅट खरेदी करायचा होता. यासाठी ते शिवाजी चौकाकडून शिवार चौकाकडे जाणा-या रस्त्यावरील एका इमारतीत ते गेले. या ठिकाणी त्यांनी फ्लॅट बघितला होता. यानंतर पुन्हा तोच फ्लॅट पाहण्यासाठी रानडे संबंधित इमारतीत आले होते.
दरम्यान, रानडे यांनी तेथील व्यक्तीला ‘माझा मुलगा येणार आहे. तो आल्यानंतर निर्णय कळवतो’ असे सांगितले. त्यामुळे सेल्स प्रतिनिधी फ्लॅटमधून त्याच्या कामासाठी बाहेर निघून गेला. त्यानंतर रानडे यांनी तेराव्या मजल्यावरून उडी मारली. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.