तळेगाव परिसरातून ६००पेक्षा अधिक परप्रांतीय मजूर मूळ राज्यात रवाना
पुणे जिल्ह्यातील बहुतांश भाग 'कामगार नगरी' म्हणून ओळखला जातो. त्यात पिंपरी-चिंचवड, चाकण, मावळ हा परिसर येत असून मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय मजूर स्थायिक झाले होते. परंतु, कोरोना विषाणूने थैमान घातले असून, याचा थेट परिणाम कामगारांच्या जीवनावर झाला आहे.
तळेगाव परिसरातून ६०० पेक्षा अधिक परप्रांतीय मजूर मूळ राज्यात रवाना
पुणे -जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक परप्रांतीय मजुरांना लॉकडाऊन फटका बसला आहे. तळेगाव, मावळ या परिसरातील तब्बल ६००पेक्षा अधिक मजुरांना छत्तीसगड आणि झारखंड या राज्यात पुणे स्थानक येथून रवाना करण्यात आले. यावेळी तळेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी महानगर पालिकेच्या बसमध्ये बसवून त्यांना पुण्याच्या रेल्वे स्थानकात सोडले.