पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या महामारीत कर्तव्यावर असताना कोरोनाची बाधा होऊन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून 50 लाख आणि पोलीस कल्याण निधीतून 10 लाख असे एकूण 60 लाख रुपये देण्यात आले. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना धनादेश देण्यात आला. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.
कोरोनामुळे मृत्यू झालेले पोलीस कर्मचारी संतोष प्रताप झेंडे, पोलीस कर्मचारी अंबरनाथ रामचंद्र कोकणे, रमेश वामण लोहकरे, यांच्या कुटुंबीयांना धनादेश देण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण-
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना महामारीची एकूण संख्या 90 हजारांचा उंबरठ्यावर आहे. पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर करोना महामारीने पायमुळं पसरवली आहेत. सध्या मात्र त्यावर काही प्रमाणात नियंत्रण आल्याचे दिसत आहे.
चोख कर्तव्य बजावत प्राणांचे दिले बलिदान-