पुणे- सरकार कोणाचेही असले तरी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणाऱ्या मूळ सूत्रधारांना पकडण्यासाठी कोणीही राजकीय इच्छाशक्ती दाखवलेली नाही, अशी खंत हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली.
दाभोलकर हत्याप्रकरणात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; हमीद दाभोलकर यांची खंत
अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर त्यांच्या हत्येला आज ६ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने मंगळवारी सकाळी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.
अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज ६ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने मंगळवारी सकाळी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हमीद दाभोलकर बोलत होते.
ते म्हणाले, कोणत्याही शासनाने नरेंद्र दाभोलकरांच्या हल्लेखोरांना पकडण्यासाठी तापसामध्ये लक्ष घातले नाही. केवळ उच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे तपास यंत्रणांनी हल्लेखोरांवर कारवाई केली आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी आता त्यांची जबाबदारी नीट निभावायला पाहिजे. त्याप्रमाणेच नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिनिमित्त यावर्षी पहिल्या स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.