पुणे - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध अशी माहिती विभागीय आयुक्य डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. विभागात अंदाजे 3 हजार 618 क्विंटल अन्नधान्याची तर, 9 हजार 638 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे.
पुणे विभागात 1 हजार 667 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 1 हजार 604 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. पुणे विभागात 9 मे 2020 रोजी 100.090 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.27 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर, उर्वरित दूध सुट्ट्या स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.