पिंपरी-चिंचवडमध्ये ६ महिन्याच्या चिमुकलीला कोरोनाची बाधा; शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा १६७ वर - pimpari chinchawad corona update
पिंपरी-चिंचवड शहरात आज सर्वाधिक १३ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, यात एका ६ महिन्याच्या चिमुकलीचा समावेश आहे. शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा १६७ वर पोहचला असून, संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात आज सर्वाधिक १३ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, यात एका ६ महिन्याच्या चिमुकलीचा समावेश आहे. शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा १६७ वर पोहचला असून, संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर ७७ जणांना कोरोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. आज एका सहा महिन्यांच्या चिमुकलीला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात प्रत्येक वयोगटातील नागरिक, तरुण, जेष्ठ नागरिक आणि चिमुकल्यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे. आज देखील एका सहा महिन्यांच्या चिमुकलीला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, शहराच्या हद्दी बाहेरील कोरोनाबाधितांवर महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज कोरोनाबाधित आढळलेले रुग्ण हे रुपीनगर, ताम्हाने वस्ती, काळेवाडी, थेरगाव, चऱ्होली, पुण्यातील नानापेठ आणि खडकी येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शहरातील काही परिसर सील करण्यात येणार-
गुरुविहार (गुरुविहार कॉलनीगार्डन–महादेव मंदिर – पुणे नाशिक–हायवे–एसबीआय एटीएम–‘ई’ प्रभागक्षेत्रिय कार्यालय–भोसरी रोलरकेटर रिंग- गुरुविहार कॉलनी गार्डन) लांडगेनगर, भोसरी (ऑक्वा गणेश कॉर्नर– स्पेरोनी इंडिया प्रा.लि.–पुणे नाशिक हायवे–हॉटेल क्लाऊड ९–स्वस्तीक ज्वेलर्स–ऑक्वा गणेश सोसायटी-ऑक्वा गणेश कॉर्नर) तापकीर चौक, काळेवाडी (हॉटेल गुरुदत्त–एस.बी.आय.एटीएम–शिवसेना कार्यालया समोर–हनुमान सुपर मार्केट–ओंकार लॅमिनेटस्–बेबीज इंग्लिश स्कुल–तुळजाभवानी मंदिर– बेंगलोर अय्यंगार बेकरी–हॉटेलगुरुदत्त) दत्तनगर, थेरगाव (पिंक लिली सोसायटी-पवना नदी-गंगा आशियाना मागील मोकळीजागा–गंगा आशियाना ‘आय’ बिल्डींग-गंगा आशियाना ‘के’ बिल्डींग-पिंक लिलीसोसायटी) कस्पटेवस्ती,वाकड.(सोनिगीरा केसरबिल्डींग ‘७’–ऍलियन्स हॉटेल समोर–कस्पटे वस्ती रोड–छत्रपती रोड–पंजाबनॅशनल बँक– सोनिगीरा सोसायटी रोड-सोनिगीरा केसर बिल्डींग ‘७’) परिसर आज मध्यरात्री ११ वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येणार आहे. सदर परिसराच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.