पुणे -पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेकदा रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नाहीत, अशी स्थिती निर्माण होते. रुग्णांना सेवा देण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवरसुद्धा ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि त्यांचे बंधू माजी नगरसेवक व उद्योजक शंकर जगताप यांच्या प्रयत्नातून पिंपळेगुरव येथे ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. आयुश्री हॉस्पिटल यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेले हे कोविड सेंटर गुरुवारपासून कार्यान्वित झाले.
बेड कमी पडत असल्याने घेतला निर्णय -
गेल्या वर्षीपेक्षा यंदा कोरोना महामारीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत कोरोना रुग्णांवर उपचारासाठी शहरात विविध ठिकाणी जम्बो कोविड सेंटर, कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. मात्र, दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या मोठी असल्याने हे कोविड सेंटर कमी पडू लागली आहेत. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना बेड मिळत नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे.अशा परिस्थितीत बेड कमी पडत असल्याने घेतला आमदार जगताप आणि त्यांचे बंधू शंकर जगताप यांनी हा निर्णय घेतला.