महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mahatma Phule Jayanti 2023: इतिहासाचा मूक साक्षीदार असलेला फुलेवाडा सजला; महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त 5 हजार किलो एकता मिसळ

महात्मा ज्योतिबा फुले यांची कर्मभूमी असलेल्या पुण्यामध्ये मोठ्या उत्साहात सकाळपासूनच जयंतीला सुरुवात झालेली आहे. महात्मा फुले यांच्या सगळ्या घटनांचा साक्षीदार असलेला फुलेवाडा सुद्धा आज प्रशासनाकडून सजवण्यात आला आहे. गंजपेठेतील फुलेवाडा जिथे महात्मा फुले राहत होते. याच ठिकाणी महात्मा फुले यांनी समतेच्या संदेश देण्यासाठी लढा दिला. आज येथे सर्वपक्षीय लोकांच्या सहभागातून पाच हजार किलोची एकता मिसळ बनवण्यात आली आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्याकडून ती मिसळ बनवून घेण्यात आली आहे.

Mahatma Phule Jayanti
महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती

By

Published : Apr 11, 2023, 11:12 AM IST

महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती

पुणे :आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती देशभरामध्ये साजरी होत आहे. 1840 पासून इतिहासाचा साक्षीदार असणारा हा फुलेवाडा आहे. याच फुलेवाड्यामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे अनेक वर्ष वास्तव्य होते. इथूनच मुलींच्या शिक्षणाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. पहिल्यांदा त्यांनी सावित्रीबाईंना शिकवले. नंतर मुलींसाठी शाळा काढल्या, असा क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा इतिहास आहे.

सत्यशोधक समाजाची स्थापना :भारतातल्या धार्मिक जात व्यवस्थेला उखडून काढण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी आयुष्यभर काम केले. एक सामाजिक चळवळ उभी केली. याच फुले वाड्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. इतिहासकारांच्या मते असेही म्हटले जाते की, फुले वाड्यामध्येच नवीन मंगलाष्टकांची तयारी करण्यात आली होती. येथूनच सत्यशोधक समाजाची नवीन विवाह पद्धत रुजू झाली. महात्मा फुले यांनी त्याला मान्यता मिळवून दिली.



अनेक घटनांचा साक्षीदार :समतेचा लढा ज्या ठिकाणाहून सुरू झाला ती समता, म्हणजे याच फुले वाड्यातील पाण्याची विहीर आहे. हीच विहीर महात्मा फुले यांनी अस्पर्श लोकांना खुली करून पाणी घेण्याची मुभा दिली. त्यामुळे सर्वात जास्त विरोध महात्मा फुलेंना या आंदोलनावेळी झाला होता. पण महात्मा फुलेंनी तो लढा पुढे नेला. समाजासह देशाला एक नवीन विचार दिला. फुले वाड्याला समता भूमीसुद्धा म्हटले जाते. कारण इथेच महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या अनेक बैठका घेतल्या. इतिहासाचा अनेक घटनांचा साक्षीदार हा वाडा पुण्यात आहे. याच वाड्यामध्ये महात्मा फुले यांची समाधी सुद्धा आहे. सावित्रीबाई फुले यांनी लावलेल्या तुळशी वृंदावनाखाली ही समाधी आहे. त्या समाधीला आज सजवण्यात आले आहे. उत्साहामध्ये पुणेकर, महाराष्ट्रातून लोक येऊन फुले वाड्यामध्ये अभिवादन करत आहेत.


इतिहासाचा साक्षीदार असलेला हा वाडा : फुले वाडा म्हणजे महात्मा फुले यांच्या जीवन चरित्राचा मुख साक्षीदार आहे. म्हणून अतिशय मजबुतपणे तो आज सुद्धा उभा आहे. या फुले वाड्याला पुरातत्व विभागाने विशेष दर्जा दिला आहे. या वाड्याचे आता स्मारकांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. यामध्ये महात्मा फुले यांच्यासोबत जे अनुयायी होते. त्यांची तेल चित्र आहेत. महात्मा फुलेंचे दोन चित्र आहेत. त्याने लिहिलेले समाज व्यवस्थेचे विरौढ, शेतकऱ्याचा आसूड, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, अशा सगळ्या महात्मा फुले यांच्या जीवननिगडित असलेल्या गोष्टींची खरी ओळख पुण्यातील फुले वाड्यात येऊनच होते. त्यामुळे इतिहासाचा साक्षीदार असलेला हा वाडासुद्धा चळवळीचा खूप मोठा भाग होता. या वाड्यामुळेच खरंतर महात्मा फुले पुण्यात आले, या ठिकाणी राहिले.

हेही वाचा : Mahatma Phule Jayanti 2023 : महात्मा फुलेंनी रचला स्त्री शिक्षणाचा पाया, जाणून घ्या त्यांच्या कार्याचा इतिहास आणि महत्व

ABOUT THE AUTHOR

...view details