पुणे- जिल्ह्यातील देवाची उरळी येथील राजयोग साडी सेंटरला आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. दुकानामध्ये ५ कामगार झोपलेले होते. या आगीत त्यांचा गुदमरून आणि होरपळून मृत्यू झाला आहे.
पुण्यातील राजयोग साडी सेंटरमध्ये अग्नितांडव, ५ जणांचा होरपळून मृत्यू - देवाची ऊरळी
एका कामगाराने दुकान मॅनेजरला फोन करून आग लागल्याची माहिती दिली. तसेच आगीमुळे गुदमरल्या सारखे होत असून बाहेर पडता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर मॅनेजर दुकानाजवळ आला. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते.
राकेश रियाड (वय २५), राकेश मेघवाल (वय २५), धर्मराम वाडीयासार (वय २५), सुरज शर्मा (वय २५) आणि धीरज चांडक (वय २३) अशी मृतांची नावे आहेत. सर्वजण नेहमी दुकानातच झोपतात. त्यानंतर दुकानाला बाहेरून कुलूप लावले जाते. मात्र, या दुकानाला आज पहाटे अचानक आग लागली. त्यावेळी एका कामगाराने दुकान मॅनेजरला फोन करून आग लागल्याची माहिती दिली. तसेच आगीमुळे गुदमरल्या सारखे होत असून बाहेर पडता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर मॅनेजर दुकानाजवळ आला. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. आतमध्ये पूर्ण कपडे असल्याने कुलूप काढताच आगीचे लोळ बाहेर पडले.
दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या आणि १० टँकर दाखल झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करीत साडेतीन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, आतमध्ये अडकलेल्या कामगारांना वाचवता आले नाही. दुकानाच्या पाठीमागील भिंतींना मोठे छिद्र पाडून सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या कामगारांनी खिडक्यांच्या काचा फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.