महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यातील 'या' ५ गणपतींची मंडपात होणार प्रतिष्ठापना, भाविकांना दर्शनाची नसणार मुभा - 5 famous ganesh mandal pune

गणपती प्रतिष्ठापना मंडपात जरी करण्यात येणार असली तरी भाविकांना त्यांच्या लाडक्या बाप्पाचे दर्शन करण्यास परवानगी नसणार आहे.

पुणे गणपती
पुणे गणपती

By

Published : Aug 17, 2020, 8:15 PM IST

पुणे- पुण्यातील ५ मानाच्या गणपतींची मंडपात प्रतिष्ठापना होणार आहे. यात मानाचा पहिला कसबा गणपती, दुसरा तांबडी जोगश्वरी, तीसरा गुरुजी तालीम गणपती आणि चौथा तुळशीबाग गणपतीचा समावेश आहे. गणपती प्रतिष्ठापना मंडपात जरी करण्यात येणार असली तरी भाविकांना त्यांच्या लाडक्या बाप्पाचे दर्शन करण्यास परवानगी नसणार आहे.

पुण्यातील ५ प्रसिद्ध गणपतींची मंडपात होणार प्रतिष्ठापना

या पाचही गणपतींना मंडपात बसवण्याचा निर्णय या गणपती मंडळांच्या अध्यक्षांनी घेतला आहे. यासाठी १० बाय १५ चा मंडप बांधण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात जे काही विधी होणार आहेत, त्या सर्व विधी या मंडपाच्या आतच केल्या जातील, असे पाचही मंडळांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जरी हे गणपती मंडपामध्ये बसवले जाणार असले तरी भाविकांना मात्र दर्शनाची मुभा असणार नाही. भाविकांना बाप्पाचे दर्शन फक्त ऑनलाइन स्वरुपात घेता येणार आहे.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी पुणे पोलीस आणि महापालिका प्रशासनाने गणेश मंडळांची बैठक घेऊन या बैठकीमध्ये कोणत्याही मंडळाने यावर्षी मंडपात गणेश मूर्ती न बसवता मंदिरातच स्थापना करावी, अशी विनंती केली होती. परंतु, या मानाच्या पाचही मंडळांनी मंडपातच गणेश मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

'ही' मंडळे साधेपणाणे गणेश उत्सव साजरा करणार

श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट

दरवर्षी होणाऱ्या वैभवशाली गणेशोत्सवाचा डामडौल रद्द करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच करण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने घेण्यात आला आहे. १२७ वर्षांची वैभवशाली परंपरा असलेला हा गणेशोत्सव यंदा प्रथमच मुख्य मंदिरात होणार आहे. गणेशभक्त आणि नागरिकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

भाऊसाहेब रंगांरी गणेश मंडळ

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, पुणेच्या गणेशोत्सवाचे यंदा १२९ वे वर्ष आहे. मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करून साधेपणाने उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना सालाबादप्रमाणे मंदिरामध्ये होणार आहे. उत्सव मोठा नसला तरी सर्व धार्मिक विधी पारंपारिक पद्धतीने केल्या जाणार आहेत.

‘बाप्पा’च्या दर्शनासाठी गणेशभक्तांना मंदिरात, मांडवात प्रवेश दिला जाणार नाही, भाविकांना सांस्कृतिक महोत्सवासह गणरायांच्या दर्शनाचा आणि आरतीचा लाभ फक्त ऑनलाईन घेता येणार आहे. कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता शहरातील गणेशोत्सव मंडळांनी उत्सव साधेपणाने आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून साजरा केला जाणार आहे.

हेही वाचा-पुण्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ

ABOUT THE AUTHOR

...view details