महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले ५ कोरोना बाधित रुग्ण; पुण्यातील रुग्णांचा आकडा १५ वर - Corona patient in maharashtra

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना बधितांची संख्या ही आता ८ वर पोहचली असून पुण्याचे ७ जण पॉझिटिव्ह आहेत.

5 Corona patient in pimpari Chinchvad, total 15 patient in Pune
पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले ५ कोरोना बाधित रुग्ण; पुण्यातील रुग्णांचा आकडा १५ वर

By

Published : Mar 15, 2020, 1:07 AM IST

पुणे -पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. आता पुन्हा ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये ३ महिला तर २ पुरुषांचा समावेश आहे. पिंपरी - चिंचवड महानगर पालिका प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता एकट्या पुण्यामध्ये कोरोना बाधीत रुग्णांचा १५ वर गेला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना बधितांची संख्या ही आता ८ वर पोहचली असून पुण्याचे ७ जण पॉझिटिव्ह आहेत. सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील पहिला दुबईहून आलेला पहिल्या ग्रुपमध्ये असलेल्या ४० जणांपैकी ४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एक जण थायलंडहुन पिंपरी-चिंचवडला आला आहे. तो पॉझिटिव्ह निघाला असून या सर्वांवर पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व पाहता महानगर पालिकेच्या प्रशासनाकडून रात्री उशिरा बैठक बोलावण्यात आली असून कोरोनाच्या विरोधात कसे दोन हात करायचे यावर चर्चा सुरू आहे.

हेही वाचा -COVID 19 : राज्यात कोरोनाचे 9 नवीन रुग्ण; एकूण बाधितांचा आकडा 26 वर

दरम्यान, उद्योग नगरी असलेल्या शहरातील अनेक नागरिकांनी कोरोनाचा भीती ने गाव गाठले असून आज पुन्हा रुग्ण आढळल्याने याचा शहरावर नक्कीच परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा -कोरोना विषाणू : गृह मंत्रालयाकडून मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाखांची मदत

ABOUT THE AUTHOR

...view details