महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देहूगाव खून प्रकरणातील ५ जण ताब्यात - crime

शुक्रवारी देहूगावमध्ये झालेल्या खून प्रकरणी देहूरोड आणि चाकण पोलिसांनी मुख्य आरोपींना जेरबंद केले आहे. मयत गुन्हेगार शंकरने आरोपींना कारागृहाबाहेर येताच ठार मारणार, अशी धमकी दिली होती. या भीतीच्या पोटी आरोपीनी त्याला ठार केल्याची कबुली पोलिसात दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर अन्य चार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

आरोपी अमित टिळेकर

By

Published : Jul 6, 2019, 11:50 PM IST

पुणे - देहूगावमध्ये झालेल्या खून प्रकरणी अवघ्या काही तासांत देहूरोड आणि चाकण पोलिसांनी मुख्य आरोपींना जेरबंद केले आहे. देहूगावमध्ये शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमरास कोयत्याने वार करून ९ जणांच्या टोळक्याने गुन्हेगार शंकर दत्तात्रय बाळसराफ याचा खून केला होता.

पोलीस ठाणे


मयत गुन्हेगार शंकरने आरोपींना कारागृहाबाहेर येताच ठार मारणार, अशी धमकी दिली होती. तो नुकताच कारागृहातून सुटला होता. सोबत चाकू घेऊन फिरत असल्याची माहिती आरोपीना होती. याच भीतीने ९ जणांच्या टोळक्याने त्याचा खून केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे. दरम्यान, खून केल्यानंतर आरोपी फरार झाले होते. त्यांचा शोध देहूरोड आणि चाकण पोलीस घेत होते. या प्रकरणी ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मंगेश शाम केदारी (वय २१ वर्षे), अवधूत साईनाथ लांगे (वय २४ वर्षे), अमित मारुती टिळेकर (वय २५ वर्षे), शुभम दिलीप परंडवाल (वय २२ वर्षे), प्रतीक तुकाराम बजबळे (वय १९ वर्षे, सर्व रा. देहूगाव माळवाडी ता. हवेली जि. पुणे) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अन्य चार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शंकर दत्तात्रय बाळसराफ हा आरोपी वरील आरोपींना ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यांपैकी आरोपींचा मित्र टिळेकर याला पोटात चाकू भोसकून शंकरने गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी त्याला जेल ही झाली होती. मात्र, मी बाहेर आल्यानंतर तुमच्या पैकी एकाला तरी ठार करेन, अशी धमकी दिली होती. तो नुकताच जेल मधून सुटला होता. शंकर आरोपींच्या शोधात होता. एवढेच नाही तर तो सोबत चाकू घेऊन फिरत असे. शुक्रवारी देहूगावमध्ये मयत शंकरला गाठले आणि दुचाकीवरून आलेल्या नऊ जणांपैकी काहींनी त्याच्यावर कोयत्याने वार केले होते. यात गंभीर जखमी होऊन गुन्हेगार शंकरचा मृत्यू झाला. शंकर आपल्याला जीवे ठार करेल या भीतीच्या पोटी आरोपीनी त्याला ठार केल्याची कबुली पोलिसात दिली आहे. अद्याप चार आरोपी फरार असून त्यांचा शोध देहूरोड पोलीस घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details