महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारामतीतील ४९ ग्रामपंचायतींचा उडणार गुलाल.. निवडणूक घेण्यास आयोगाची मान्यता - ग्रामपंचायत निवडणूक

३१ जुलै ते ३१ डिसेंबरपर्यंत मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यास नुकतीच निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. ८ डिसेंबर सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

baramati election'
बारामतीतील ४९ ग्रामपंचायतींचा उडणार गुलाल

By

Published : Nov 29, 2020, 3:17 PM IST

बारामती (पुणे) - बारामतीतील ३१ जुलै ते ३१ डिसेंबरपर्यंत मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यास नुकतीच निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून ८ डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.

बारामती तालुक्यातील सुमारे ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता पुढील २ महिने गाव कारभारी ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व राखण्यासाठी पायाला भिंगरी बांधून कामाला लागणार आहेत. तर काहींनी मागील काही दिवसांपासूनच निवडणुकीच्या तयारीसाठी गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. तालुक्‍यातील ४५ ग्रामपंचायतींची ऑगस्टमध्येच मुदत संपली आहे तर उर्वरित ४ ग्रामपंचायतींची नोव्हेंबरमध्ये मुदत संपत आहे. बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींची प्रभाग रचना व आरक्षणास मागेच मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.

या ग्रामपंचायतींसाठी होणार रणधुमाळी -.

अंजनगाव, बऱ्हाणपूर, आंबी, बाबुर्डी, चोपडज, ढाकाळे, ढेकळवाडी, देऊळगाव रसाळ, गोजुबावी, घाडगेवाडी, होळ, सदोबाचीवाडी, सस्तेवाडी, जळगाव सुपे, जोगवडी, जैनकवाडी, कटफळ, कारखेल, कांबळेश्वर, कोऱ्हाळे बुद्रुक, थोपटेवाडी, खंडोबाचीवाडी, खांडज, लाटे, माळेगाव खुर्द, माळवाडी(लाटे), माळवाडी(लोणी), मेखळी, मोढवे, नारोळी, निंबुत, निरावागज, पिंपळी, सावळ, सांगवी, शिरवली, शिरिष्णे, सोनवडी सुपे, सोनगाव, तरडोली, उंडवडी सुपे, वढाणे, वडगाव निंबाळकर, वाकी, झारगडवाडी, माळेगाव बुद्रुक, पाहुणेवाडी, मळद आणि कन्हेरी.

ABOUT THE AUTHOR

...view details