पुणे - राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे-मुंबई महामार्गावरून तब्बल 45 लाख रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे. यामध्ये मद्याची अवैधरित्या वाहतूक केली जाणार होती. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. एकनाथ बाबली लोके (वय 25 वर्षे, तळवडे, सावंतवाडी, सिंधुदुर्ग) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
सापळा रचून पकडला टेम्पो
या प्रकरणी अधिक माहिती अशी, की राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांना जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून अवैधरित्या मद्याची वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुणे मुंबई महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचले. त्यानंतर गुरुवारी दुपारच्या सुमारास मावळ तालुक्यातील हॉटेल बगीचा समोर संशयास्पद रित्या धावणाऱ्या आयशर टेम्पोला सीमाशुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी थांबवले.