421 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू पुणे :शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, आज खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गेल्या आठवड्याभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढला असून, पुणेकरांची तहान भागवणारे खडकवासला धरण भरलेले आहे.
421 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू : जुलै महिन्यातच पहिला पाऊस लांबला होता. त्यामुळे खडकवासला धरणातून पाणी विसर्ग आजपर्यंत करता आला नाही. गेल्या आठवड्यातील संततधार पावसामुळे खडकवासला धरण साखळीतील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरण पाण्यात वाढ होत आहे. त्यामुळे मुळा मुठा नदीत 421 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहरातील मुळा मुठा नदी किनारी असणाऱ्या घरांना इशारा देण्यात येणार आहे. तशी प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. नदीकाठच्या रहिवाशांना सुद्धा सूचना देण्यात आल्या आहेत.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला : पाऊस लांबल्यामुळे यावर्षी पुण्यात चिंता व्यक्त केली जात होती. परंतु खडकवासला धरण भरल्याने आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी, शेतीसाठी पाणी सोडण्यात येणाऱ्या विसर्ग आजपर्यंत सोडण्यात आला नव्हता. आता पाण्याची पातळी वाढल्याने हा विसर्ग सोडण्यात आला आहे. सकाळपर्यंत हा विसर्ग सुरू असणार असल्याची माहिती, जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे. पाण्याच्या पातळीत रात्रभर पाऊस जाऊन वाढ झाली तर, आणखी जास्त क्यूसेक्सनने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे.
पुणे शहराला पावसाने मिळाला दिलासा : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील खडकवासला धरणात एक टीएमसी पाण्याने वाढ झाली आहे, तर पानशेत धरण सुद्धा पुन्हा भरले आहे. त्यामुळे पुणे शहराला पावसाने थोडासा दिलासा दिला आहे.
हेही वाचा -
- Khadakwasla Dam: पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात झाली वाढ, पाहा व्हिडिओ
- The rain subsided: खडकवासला धरणातून २९९६ क्युसेक पाण्याचा विसर्ग कमी
- Water Discharge From Khadakwasla Dam: खडकवासला धरणातून ३ हजार ४२४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू; नागरिकांना सतर्कतेचा इशारा