पुणे- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हद्दीत रस्त्याच्या वादातून 42 वर्षीय महिलेची राहत्या घरात डोक्यात दगडी पाटा घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. कल्पना शितोळे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून, चाकणमधील शंकरनगर येथील त्या रहिवासी आहेत.
खळबळजनक! रस्त्याच्या वादातून 42 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या; एक संशयित ताब्यात
रस्त्याच्या वादातून 42 वर्षीय महिलेची राहात्या घरात डोक्यात दगडी पाटा घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. कल्पना शितोळे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.
रस्त्याच्या वादातून 42 वर्षीय महिलेची निघृण हत्या
घरासमोरून जाण्यावरून कल्पना यांचा सतत शेजाऱ्यांशी वाद होत होता. यातूनच त्यांची हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. यासंबंधी कल्पना यांच्या शेजारील एका रहिवासी संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात देण्यात आला आहे. "सख्खे शेजारी.. पक्के वैरी" अशीच घटना चाकण उद्योगनगरीत घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.