महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात ४० वर्षीय नराधमाचा चिमुरडीवर बलात्कार - Shirur police station news

जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गावात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. येथे एका ४० वर्षीय व्यक्तीने ४ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पोलीस ठाणे

By

Published : Nov 4, 2019, 2:04 PM IST

पुणे- जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गावात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. येथे एका ४० वर्षीय व्यक्तीने ४ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चिमुकल्या मुलीवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप पाहायला मिळत आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

दारू रामदास माळी असे बलात्कार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. चिमुकली मुलगी घराजवळ खेळत होती. त्यावेळी आरोपीने चिमुकलीला तिच्या घराशेजारी नेले व तिच्यावर बलात्कार केला. या घटनेबाबत शिरूर पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी चिमुकलीला पुण्यातील ससुन रुग्णालयात दाखल केले असून आरोपी दारू माळी याला अटक केली आहे. मुलगी वाचवा, देश वाचवा, मुलींचा, महिलांचा आदर करा, असे संदेश दिले जातात. मात्र, यातून कुठलाच बोध घेतला जात नाही हे सदर घटनेतून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा-परतीच्या पावसामुळे पुणे जिल्ह्यात मोठे नुकसान; पंचनामे तत्काळ करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ABOUT THE AUTHOR

...view details