महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिरुर तालुक्यात चोरांचा धुमाकूळ; एका गावातील ४ दुकाने फोडली तर एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला - 4 stores from two villages of shirur tehsil were looted by robbers

चोरट्यांनी आज मध्यरात्रीच्या सुमारास तालुक्यातील टाकळी हाजी गावामध्ये चार दुकाने फोडली. तर मलठण गावामध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने परिसरातील नागरिक जागे झाल्याने चोरट्यांचा हा प्रयत्न फसला आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले चोरटे

By

Published : Sep 5, 2019, 2:10 PM IST

पुणे- जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ माजवला आहे. चोरट्यांनी आज मध्यरात्रीच्या सुमारास तालुक्यातील टाकळी हाजी गावामध्ये चार दुकाने फोडली आहेत तर मलठण गावामध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने परिसरातील नागरिक जागे झाल्याने चोरट्यांचा हा प्रयत्न फसला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हेच ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले चोर

शिरूर तालुक्यात या आठवड्यातील चोरीची ही तिसरी घटना असून दोन दिवसांपूर्वीच चोरट्यांनी जांबूत या ठिकाणी तीन दुकाने फोडली होती तर पिंपरखेड या ठिकाणी सहा दुकाने फोडली होती. रात्रीच्या सुमारास सुनसान परिसर पाहात चोरटे पाळत ठेवून चोरी करतात. यामध्ये चोरी करताना दरोडेखोरांकडून नागरिकांना मारहाण देखील होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सातत्याने सुरु असलेल्या चोरीच्या घटना रोखण्याचे मोठे आव्हान पुणे ग्रामीण पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details