पुणे - किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणात चौघांनी मिळून एकाला लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मधूबन कॉलनी येथे घडली.
किरकोळ भांडणावरुन चौघांची एकाला जबर मारहाण, गुन्हा दाखल - bhosari crime
किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणात चौघांनी मिळून एकाला लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मधूबन कॉलनी येथे घडली.
दरम्यान, घटनेप्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश हरिश्चंद्र सावंत (वय-२८, रा.मधुबन कॉलनी, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगत भैरू सावंत (वय-३२) नितीन भैरून सावंत (वय-२७) नाथ शिंदे (वय-२५) कन्या शिंदे (वय-२६) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मुलांच्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून आरोपींनी आपापसात संगनमत करून फिर्यादींना अडवले. त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्या लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. यामध्ये फिर्यादी जखमी झाले असून, चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.