पुणे- दिवसेंदिवस पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. अशातच पुण्यातून आज एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ससून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एका 4 महिन्याच्या चिमुरड्याने कोरोनावर मात केली आहे. ससून रुग्णालयात उपचार घेणारे 9 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये एका 4 महिन्याच्या चिमुरड्याचा आणि 9 वर्षीय मुलीचा समावेश आहे.
4 महिन्याच्या चिमुकल्याची कोरोनावर मात, ससून रुग्णालयातील 9 जण आज कोरोनामुक्त - corona update in pune
पुण्यातून आज एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ससून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एका 4 महिन्याच्या चिमुरड्याने कोरोनावर मात केली आहे.
ससून रुग्णालयात एकूण ११४ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. यातील २१ रुग्णांची संख्या गंभीर आहे. आतापर्यंत १३ रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. तर ससूनमध्ये ५९ कोरोनाबाधित रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. पुण्यात आज दिवसभरात कोरोनाचे १२२ नवीन रुग्ण आढळले असून, कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ३३९ इतका झाला आहे. तर आज दिवसभरात 4 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील एकूण मृतांचा आकडा ७९ इतका झाला आहे. तर आतापर्यंत २०३ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत.