महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुदळवाडीत भीषण आग, ४ गोडाऊन जळून खाक - pune

त्याचप्रमाणे टाटा मोटर्स, बजाज ऑटो, एमआयडीसी चाकण, फोर्स मोटर्स, सेंच्युरी एन्का, जय हिंद इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या गाड्या देखील घटनास्थळी दाखल झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार मनोज मोरे आणि निकेश मोरे यांची ४ गोडाऊन जाळून खाक झाली

आग

By

Published : Apr 8, 2019, 11:25 AM IST

पुणे - चिखली कुदळवाडी येथे आज पहाटे ५ वाजता आग लागून ४ गोडाऊन जळून खाक झाले आहेत. या आगीमध्ये भंगाराचे साहित्य, लाकूडफाटा तसेच रसायन साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. आगीची तीव्रता भयानक असल्यामुळे घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य अग्निशमन केंद्रातून तीन वाहने तसेच प्राधिकरण, भोसरी, तळवडे, चिखली अग्निशमन केंद्रातून प्रत्येकी एक गाडी घटनास्थळी रवाना झाली.

गोडाऊनला लागलेली आग

त्याचप्रमाणे टाटा मोटर्स, बजाज ऑटो, एमआयडीसी चाकण, फोर्स मोटर्स, सेंच्युरी एन्का, जय हिंद इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या गाड्या देखील घटनास्थळी दाखल झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार मनोज मोरे आणि निकेश मोरे यांची ४ गोडाऊन जाळून खाक झाली. यात किती रुपयांचे नुकसान झाले हे कळू शकले नाही. या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. नुकतीच आग नियंत्रणात आली असून, कुलींगचे काम सुरु असल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details