पुणे :कात्रज घाटातील अपघात काही थांबताना दिसत नाही. रात्री दोनच्या सुमारास एका साखर घेऊन जाणारा ट्रक आणि खाजगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाला आहे. या अपघातात 4 नागरिकांचा जागीच मृत्यू झाला आहे. 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकच्या केबिनचा अपघातात चक्काचूर झाला आहे. हा अपघात कात्रज घाटाजवळ स्वामी नारायण मंदिर या ठिकाणी झाला आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. चार जणांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. अधिक तपास पोलीस करत आहेत.
रात्री दोनच्या सुमारास अपघात :अपघात झाला तेव्हा सर्व प्रवासी गाढ झोपेत होते. साधारण रात्री दोनच्या सुमारास अपघात झाला आहे. पुणे बेंगलोर महामार्गावर स्वामी नारायण मंदिर आहे. त्या ठिकाणी हा अपघात झाला आहे. अपघातात चार जण जागीच ठार झाले आहे. 22 जण जखमी असल्याची माहिती देण्यात आली आहे. या मृत लोकांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या अपघाताची माहिती मिळताच कात्रज पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले आहेत.
ब्रेक झाल्याने अपघात-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अपघातस्थळी भेट दिली. अपघातामध्ये 22 जण जखमी असून त्या सर्वांवर उपचार सुरू आहेत. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, की हा अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. ब्रेक फेल झाल्याने ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. आम्ही तपासाची वाट पाहणार आहोत. पोलीस आणि प्रशासनाने चोख काम करून जखमींना रुग्णालयात दाखल केल्याचेही खासदार सुळे यांनी सांगितले.
जखमींवर उपचार सुरू : या ट्रॅव्हल्समध्ये एकूण 21 प्रवासी, 1 ड्रायव्हर, आणि एक क्लीनर असे एकूण 23 जण होते. तर साखर घेवून जाणाऱ्या ट्रकमध्ये एक ड्रायव्हर, दोन मालक असे तीनजण होते. त्यापैकी ससून हॉस्पिटल येथे पाच, चव्हाण हॉस्पिटल येथे नऊ, नवले हॉस्पिटल येथे सहा, मंगेशकर हॉस्पिटल येथे दोन, असे एकूण 22 जण उपचार घेत आहेत. स्थानिक नागरिकांनी ही घटनास्थळी अपघातानंतर धाव घेऊन मदत करण्यास सुरुवात केली. रात्रीचा अंधार असल्याने मदत करण्यात अडथळा येत होता. अपघातातील इतर प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा : Beed Accident News: बीड जिल्ह्यात दोन अपघातात 3 ठार; ट्रॅव्हल्सने दोघांना चिरडले, तर दुसऱ्या घटनेत टेम्पोने दिली दुचाकीला धडक