पुणे- शहरातील पी.एन गाडगीळ सराफ पेढीच्या प्रमुखाला तब्बल ५० कोटी रुपयांच्या खडणीसाठी धमकवण्यात आले होते. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांचे देखील नाव आले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून बांदल यांना पक्षाने निलंबित केले असून या प्रकरणी पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे.
पुण्यातील पी.एन गाडगीळ खंडणी प्रकरणी चार जणांना अटक - pune
गाडगीळ यांच्याकडे काम करत असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरातली एक व्हिडिओ क्लिप तयार केली होती. या क्लिपवरून गाडगीळ यांना ब्लॅकमेल करत ५० कोटींची मागणी करण्यात आली होती. त्यावरून पोलिसांनी तपास करत ४ आरोपींना अटक केली आहे.
चारही आरोपी मंगलदास बांदल यांच्या संपर्कात असल्याचे उघड झाल्यावर बांदल यांनाही गेल्या काही दिवसांपासून शहर पोलिसांकडून चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाडगीळ यांच्याकडे काम करत असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरातली एक व्हिडिओ क्लिप तयार केली आणि या क्लिपवरून गाडगीळ यांना ब्लॅकमेल करत ५० कोटींची मागणी केली होती. त्यावरून पोलिसांनी तपास करत ४ आरोपींना अटक केली आहे. यातले आरोपी हे बांदल यांच्या संपर्कात असल्याच्या कारणावरून सध्या बांदल यांची चौकशी सुरू आहे.
हेही वाचा-'कोरोना'ची धास्ती! येरावडा कारागृहातील कैद्यांसाठी तुरुंग प्रशासनाकडून मास्कसह सॅनिटायझर