पुणे -महाराष्ट्र मंडळ संस्थेच्या टिळक रस्ता येथील विद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र मंडळ आणि पुणे मल्लखांब संघटनेतर्फे 39 व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद तसेच निवड चाचणी मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 9 आणि 10 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील 34 जिल्ह्यातले 900 मल्लखांबपटू सहभागी झाले आहेत.
39 व्या राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेचे पुण्यात आयोजन हेही वाचा -जगज्जेत्या ओकुहाराने गमावले पहिले स्थान, यू फेईने जिंकले चीन ओपनचे जेतेपद
या स्पर्धेचे उद्घाटन रामोजी फिल्म सिटीचे सीईओ तसेच मल्लखांब खेळातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजीव जालनापूरकर, महाराष्ट्र मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले, पीएनजी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेच्या माध्यमातून मल्लखांब सारख्या देशी खेळाला अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे, या खेळाचे नव्या पिढीला मार्गदर्शन व्हावे आणि आगामी काळात मल्लखांबाचा अधिकाधिक प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यस्तरीय संघाची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे.