महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊन काळात पुण्यात अडकलेले नांदेडमधील ३८ मजूर स्वगृही रवाना - पुणे लॉकडाऊ

नांदेड जिल्हाधिकारी यांची परवानगी आल्यानंतर कोव्हिड-१९ च्या अनुषंगाने या कामगारांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या वाहनांना जाण्यासाठी परवानगी देण्यात आली.

लॉकडाऊन काळात पुण्यात अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील ३८ मजूर तीन वाहनांमधून पुण्यातून स्वगृही रवाना
लॉकडाऊन काळात पुण्यात अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील ३८ मजूर तीन वाहनांमधून पुण्यातून स्वगृही रवाना

By

Published : May 8, 2020, 7:09 PM IST

पुणे -मजुरांना पाठविण्यापूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम व नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी समन्वय साधून याबाबत एकमेकांना परवानगी दिली. नांदेड जिल्हाधिकारी यांची परवानगी आल्यानंतर कोव्हिड-१९ च्या अनुषंगाने या कामगारांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या वाहनांना जाण्यासाठी परवानगी देण्यात आली.

लॉकडाऊन काळात पुण्यात अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील ३८ मजूर तीन वाहनांमधून पुण्यातून स्वगृही रवाना

त्यांना पाठविण्यापूर्वी ग्रामीण मुळशी तालुक्यामध्ये लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे, उद्योगधंदे सुरू असून आपल्या हाताला मिळणारे काम खंडीत होणार नाही, याची त्यांना कल्पना देण्यात आली. तथापि, ते थांबण्यासाठी तयार नसल्यामुळे आज या मजुरांना रवाना करण्यात आले. तहसील कार्यालयातर्फे प्रत्येक प्रवाशाला ऑरेंज ज्यूसची बॉटल सोबत देण्यात आली. प्रशासनाकडून योग्य ती दक्षता घेऊन सोशल डिस्टन्सिंग पाळून त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details