पुणे -शासकीय कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह चार नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसह एकुण 36 जणांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास स्वारगेट येथील पाणीपुरवठा विभागात घडली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आमदार योगेश टिळेकर यांच्यासह नगरसेवक वीरसेन जगताप नगरसेविका रंजनाताई टिळेकर, उषा कामठे आणि राणी भोसले यांच्यासह 36 कार्यकर्त्यांचा समावेश आहे. याप्रकरणी अषित वेदप्रकाश जाधव (56) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पाणीपुरवठा केंद्रात तोडफोड केल्याप्रकरणी भाजप आमदारांसह 36 जणांना अटक - पाणीपुरवठा केंद्र आंदोलन
कोंढवा क्षेत्रीय कार्यालयातंर्गत व्यवस्थित पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप करीत योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली आज 35 ते 40 जणांनी स्वारगेट पाणीपुरवठा कार्यालयात आंदोलन केले. टिळेकर यांच्यासह नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी कार्यालयात गोंधळ करत टेबलावरील वस्तू फेकून काचांची तोडफोड केली.
कोंढवा क्षेत्रीय कार्यालयातंर्गत व्यवस्थित पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप करीत योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली आज 35 ते 40 जणांनी स्वारगेट पाणीपुरवठा कार्यालयात आंदोलन केले. टिळेकर यांच्यासह नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी कार्यालयात गोंधळ करत टेबलावरील वस्तू फेकून काचांची तोडफोड केली. त्याशिवाय माजी आमदार टिळेकर यांनी फिर्यादी अषित यांना कार्यालयाबाहेर ओढत आणून टाळे लावले. अतिष यांच्यासह उपअभियंता राहूल भोसले यांच्या कपाळाला गंध लावून आरती केली, तर इतर कार्यकर्त्यांनी घोषणबाजी करीत शिवीगाळ केली. स्वारगेट पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत टिळेकर यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्त्यांसह एकूण 36 जणांना अटक केली आहे.