पुणे-भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारीला विजयस्तंभ शौर्यदिवस साजरा होणार आहे. त्यासाठी देशभरातून भाविक विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येथे येतात. त्यामुळे परिसरात शांतता व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या परिसरात 350 सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. तसेच 10 ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वत्र परिसरावर नजर ठेवली जाणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी दिली.
भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिनी राहणार 350 सीसीटीव्हीची कॅमेऱ्याची नजर - भीमा कोरेगाव शौर्यदिनी राहणार 350 सीसीटीव्हीची नजर
भीमा कोरेगाव येथे मागील दोन वर्षांपूर्वी विजयस्तंभ परिसरात दंगलीचे स्वरुप आले होते. त्यावेळी काही समाजकंटकांमुळे येथे हिंसक वळण आले होते. त्यामुळे या परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून शासकीय पातळीवर सर्व यंत्रणा पेरणेफाटा येथे ठाण मांडून आहे.
हेही वाचा-'व्यायाम करा, धान्य दळा', दिल्लीमध्ये अनोख्या पिठाच्या गिरणीचा शोध
भीमा कोरेगाव येथे मागील दोन वर्षांपूर्वी विजयस्तंभ परिसरात दंगलीचे स्वरुप आले होते. त्यावेळी काही समाजकंटकांमुळे येथे हिंसक वळण आले होते. त्यामुळे या परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून शासकीय पातळीवर सर्व यंत्रणा पेरणेफाटा येथे ठाण मांडून आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेऱ्यांचा आधार घेण्यात आला आहे. परिसरात सर्व कॅमेऱ्यांचे चित्रीकरण कंट्रोल रुमला जोडण्यात आले आहे. त्या ठिकाणावरून सर्वत्र नजर ठेवली जाणार आहे.