भोरच्या खडकाळ माळावर फुलवलं नंदनवन पुणे: मायकल जॉन (वय ६७) आणि ऍन्जी (वय ५९) हे जर्मन, इटली, फ्रान्समधील कंपन्यांमध्ये संचालक म्हणून काम केल्यानंतर मायकल पत्नी ऍन्जीसह २०१३ मध्ये पुण्यात आले. पुण्यातील भोर तालुक्यातील कांबरे गावच्या माळरानावर मायकेल जॉन आणि ॲंन्जी या जर्मन दाम्पत्यानी नंदनवन फुलवले आहे. आयुष्यभर कॉर्पोरेट क्षेत्रात काम केल्यानंतर, भारतात शेती करण्याचा निर्णय घेऊन हे दांपत्य, कांबरे गावात स्थायिक झाले.
30 लोकांना रोजगार उपलब्ध : 13 एकर खडकाळ जमिनीवर 240 प्रकारची तब्बल 35 हजार झाडे लावली. अभिनव पद्धतीने शेतीचा प्रयोग करत गावातील 30 लोकांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. लोकांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी मराठी, हिंदी भाषेचे शिक्षण घेतले. समाजाने आपल्याला जे दिले आहे. आपणही त्यांना काही देणे लागतो. या भावनेने ते हे काम करत आहेत. ते शेतीच्या संबंधाने लोकल ते ग्लोबल अशा सर्व प्रयोगांचा कांबरे येथे राहून अभ्यासही करत आहेत. गावातील सर्व सण उत्सवांमध्ये ते सहभागी होत असतात. या भागाच्या लोकप्रतिनिधी खासदार सुप्रिया सुळेंकडून दखल घेण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी सुळेंनी या जर्मन दांम्पत्याची भेट घेऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
भारतीय नागरीकत्व स्वीकारले : जर्मन दुतावासाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यावर मायकल आणि ऍन्जीन्जी यांना २०१९ मध्ये दहा वर्षासाठी भारतीय नागरिकत्व मिळाले, मात्र त्यासाठी दहा कोटी रुपयांची गुंतवणूक आणि किमान २० लोकांना रोजगाराची अट होती. जन्माने जर्मन असणाऱ्या या दोघांनीही भारतीय नागरीकत्व स्वीकारले. आयुष्यभर कॉर्पोरेट क्षेत्रात काम केल्यानंतर या दोघांनी भारतात शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्व नियम व अटी पुर्ण करुन 2018 पासून हे दोघे कांबरे गावात स्थायिक झाले.
सुप्रिया सुळे यांनी केल कौतुक : या जर्मन दापत्यांनी शेतीमध्ये 10 कोटींची गुंतवणूक केली आहे. गावातील 30 लोकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांना या भागाची भुरळ पडली आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या या कार्याची दखल घेत दोन दिवसांपूर्वी त्यांची भेट घेऊन त्याचे कौतुक केले आहे. भारतातले अनेक नागरिक रोजगार व्यवसायासाठी देशाबाहेर जातात. परंतु भारतात सुद्धा व्यवसाय करता येऊ शकतो. हे जर्मन दापत्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे परिसरामध्ये त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा :Indias Deepest Metro Station जमिनीच्या 108 फूट खाली भूमिगत मेट्रो स्टेशन