पुणे -येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 141वा दिक्षांत समारंभ क्षेत्रपाल मैदानावर लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. एनडीएतील तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर एनडीएतील 141वी तुकडी देशसेवेसाठी भारतीय संरक्षण दलात दाखल होणार आहे. एनडीए कमांडंट लेफ्टनंट जनरल असित मिस्त्री आणि दक्षिण आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल जेएस नैन यांनी नरवणे यांचे स्वागत केले. कोरोनाच्या सावलीत प्रतिष्ठित पासिंग आऊट परेड आयोजित करण्याचा हा चौथा प्रसंग होता.
राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे पोर्टल महिला कॅडेट्ससाठी होणार सुरू -
मेळाव्याला संबोधित करताना लष्करप्रमुख म्हणाले, "आम्ही राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे पोर्टल महिला कॅडेट्ससाठी उघडत असताना, मी अपेक्षा करतो की तुम्ही सर्व त्यांचे त्याच भावनेने आणि व्यावसायिकतेने स्वागत कराल, ज्याप्रमाणे भारतीय सशस्त्र दल जगभरात ओळखले जाते. त्याचपद्धतीने राष्ट्रीय संरक्षण अकादमी ओळखले जाईल. नेहमी लक्षात ठेवा की येथून कैडेट्स वेगवेगळ्या अकॅडमीत जातील. वेगवेगळे पोशाख परिधान करतील. मात्र, नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की कोणतीही एक सेवा स्वतःहून आधुनिक युद्धे लढू शकत नाही आणि जिंकूही शकत नाही, असे देखील यावेळी लष्करप्रमुख नरवणे म्हणाले.
यंदा एनडीएच्या 305 कँडिडेट उत्तीर्ण -