पुणे - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण देशातील व्यवहार ठप्प झाले आहेत. कंपन्या, दुकानं, व्यवसाय बंद असल्यामुळे रोजगार बंद झाले आहेत. लाखो नागरिकांना याचा फटका बसला आहे. संकटात सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी अनेक संस्था, मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, दानशूर नागरिक पुढे येत आहेत. जमेल तशी मदत या गरजू लोकांना करत आहेत. पुण्यातील शीख बांधवानी कोरोनाशी लढा देण्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या 300हून अधिक पीपीई किट्स डॉक्टरांकडे सुपूर्द केल्या आहेत.
कोरोनाच्या लढाईत शिख बांधवांचा सहभाग, डॉक्टरांसाठी 300 पीपीई किट्स - corona news
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक गरिब नागरिकांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा गरिब नागरिकांना पुण्यातील शीख बांधवानी मदत केली आहे. तसेच 300 हून अधिक पीपीई किट्स डॉक्टरांकडे सुपूर्द केल्या आहेत.
![कोरोनाच्या लढाईत शिख बांधवांचा सहभाग, डॉक्टरांसाठी 300 पीपीई किट्स pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6909118-714-6909118-1587641597840.jpg)
शिख बांधवांनी डॉक्टरांसाठी दिल्या 300 पीपीई किट्स
कोरोनाबाधित मुस्लीम मृतदेहांचे दफन करणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेला जवळपास १०० किट, आर्मी हॉस्पिटलला १०० आणि एड्सबाधित रुग्णांसाठी काम करणाऱ्या संघटनेला ५० हून अधिक पीपीई किट देण्यात आल्या आहेत,अशा एकूण ३०० किट देण्यात आल्या आहेत.