पुणे- नारायणगाव येथील कांदळी एमआयडीसीमधील फिनीक्स पॉलिमर इंडस्ट्रीजच्या पाण्याची टाकी साफ करत असताना तिघे टाकीत पडले. घटनेत १५ वर्षीय अल्पवयीन मुलासह एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राजूकुमार कलेश्वर ठाकूर वय १५, बिट्टुकुमार महेंद्र यादव (वय १९) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर, रसुल युनुस तांडेल (वय ३५ ) हे जखमी आहेत. नारायणगावजवळील कांदळी एमआयडीसीमधील फिनीक्स पॉलिमर इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये असलेल्या पाण्याची टाकी साफ करण्यास अल्पवयीन मुलासह दोघेजण गेले होते. त्यापैकी राजूकुमार आणि बिट्टुकुमार हे टाकीच्या आत उतरले, तर रसुल हे बाहेर उभे होते.