महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

१ लाख रुपये किमतीचा ३ किलो २२५ ग्रॅम गांजा जप्त; बारामती पोलिसांची कारवाई

बारामतीमध्ये छापा टाकून पोलिसांनी १ लाख रुपये किमतीचा ३ किलो २२५ ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी एका महिलेला ताब्यात घेतले असून दोघे फरार आहेत. गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली. आरोपींनी घरात कळशी व हंड्यामध्ये गांजा लपवला होता.

Cannabis
गांजा जप्त

By

Published : Jul 9, 2020, 3:01 PM IST

पुणे (बारामती) - शहरातील आमराई परिसरातील अनंतनगर येथे छापा टाकून पोलिसांनी १ लाख रुपये किमतीचा ३ किलो २२५ ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी एका महिलेला ताब्यात घेतले असून दोघे फरार आहेत. गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली.

१ लाख रुपये किमतीचा ३ किलो २२५ ग्रॅम गांजा जप्त

उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांना अनंतनगर येथे गांजाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी पथकासह त्या ठिकाणी छापा मारला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी दीपक प्रकाश सकट व सेवक प्रकाश सकट या दोघांनी पळ काढला. मात्र, आरोपी महिला सुनिता प्रकाश सकट ही पळून जाण्यात अयशस्वी ठरली. पोलिसांनी सुनिताला ताब्यात घेतले. आरोपीच्या घराची झडती घेतली असता, कळशी व हंड्यामध्ये प्लास्टिकच्या पिशवीत १ लाख रुपये किमतीचा ३ किलो २२५ ग्रॅम गांजा आढळला.

या प्रकरणातील आरोपींवर एनडीपीएस अ‌ॅक्टनुसार(अंमली पदार्थ विरोधी कायदा) बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले, योगेश शेलार, फौजदार संदिपान माळी, पोलीस नामदार ओंकार सिताप, पोलीस कॉन्स्टेबल राजेश गायकवाड, सिध्देश पाटील, पोपट कोकाटे, सुहास लाटणे, अंकुश दळवी, दशरथ इंगवले, अजित राऊत, योगेश कुलकर्णी, उमेश गायकवाड, अकबर शेख, कांबळे यांनी ही कारवाई केली.

ABOUT THE AUTHOR

...view details