महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे : पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेली कार, तिघांचा बुडून मृत्यू - पाण्यात कार वाहून गेली न्यूज

जेऊरजवळच्या रस्त्यावरील पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात लोंढ्यात एक स्विफ्ट कार वाहून गेली. यात पिंपरी-चिंचवडमधील तिघांचा मृत्यू झाला आहे.

3 drowned after car swept away by water on Jeur bridge pune
पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेली कार, तिघांचा बुडून मृत्यू

By

Published : Oct 17, 2020, 2:20 PM IST

पुणे - जेऊरजवळच्या रस्त्यावरील पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात लोंढ्यात एक स्विफ्ट कार वाहून गेली. यात पिंपरी-चिंचवडमधील तिघांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर (काल) शुक्रवारी, तिसऱ्या दिवशी तिघांच्या मृतदेहांसह कार पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे. राहुल नवनाथ टोणपे (वय 27 रा. मूळ झरे, ता. करमाळा, सध्या थेरगाव पिंपरी-चिंचवड), गजानन सदाशिव वैयकर (वय 72 रा. करमाळा, सध्या रा. पिंपरी चिंचवड) आणि त्यांचा मुलगा सचिन वैयकर (वय. 38) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल याचा गाड्या भाड्याने देण्याचा व्यवसाय करायचा. गेल्या बुधवारी सकाळी राहुल हा स्विफ्ट डिझायर गाडी घेऊनपुण्यातून प्रवासी भाडे घेऊन करमाळा तालुक्यात गेला होता. त्या दिवशी दुपारनंतर कुटुंबीयांशी त्याचा संपर्क तुटला. त्यामुळे वडील नवनाथ टोणपे यांनी पिंपरी चिंचवडमध्ये वाकड पोलीस ठाण्यात मुलगा राहुल मोटारीसह बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिली आहे.

टोणपे यांनी करमाळा तालुक्यातील जेऊर येथील नातेवाईक शिवाजी कदम यांच्याशी संपर्क साधून मुलाबाबत चौकशी केली. त्यावेळी जेऊर ते लव्हे रस्त्याच्या पुलावर पाण्याच्या लोंढ्यात मोटार वाहून गेल्याची माहिती समोर आली.

तिसऱ्या दिवशी मिळला मृतदेह -
जेऊर ते लव्हे गावच्या रस्त्याच्या पुलावर तीन दिवसांपूर्वी अतिवृष्टीने पाण्याचा लोंढा आल्याने त्यात मोटार वाहून गेली होती. तिसऱ्या दिवशी पाण्यातून क्रेनच्या साह्याने पोलिसांनी मोटार बाहेर काढली असता त्यात तिन्ही मृतदेहही सापडले असून हे सर्व जण पिंपरी-चिंचवडमधील असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details