इंदापूर पुणेचारचाकी वाहन अडवत वाहनावर गोळीबार करून तब्बल ३ कोटी ६० लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुकपाटी येथे शुक्रवार दि. 26 रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.
फायरिंग करून तब्बल ३ कोटी ६० लाख लुटले, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना - फायरिंग करून तब्बल ३ कोटी ६० लाख लुटले
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी पहाटे चारचाकी गाडीवर फायरिंग करुन तब्बल साडेतीन कोटीची रक्कम लंपास केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
गाडीवर फायरिंग मिळालेल्या माहितीनुसार भावेशकुमार अमृत पटेल वय ४० वर्ष रा. कहोडा, ता. उंझा, जि. मेहेसाना राज्य गुजरात, सध्या रा. पंचरत्न बिल्डींग, मुंबई, यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार दाखल केली आहे. ते शुक्रवारी २६ ऑगस्ट रोजी रात्री २:३० वाजण्याच्या सुमारास मौजे वरकुटे पाटी गावचे हददीत पुणे- सोलापुर राष्ट्रीय महामार्गांवर रोडवर गतीरोधकावर आल्यावर चारचाकी स्कॉपीओ गाडी नंबर. टी. एस. ०९/ ई.एम. ५४१७ ही सोलापुर पुणे रस्त्याने चालवित घेवुन येत असताना अज्ञात चार अनोळखी चोरटे यांनी पायी चालत येवुन हातात लोखंडी टॉमी दाखवून तक्रारदार यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु फिर्यादी यांनी गाडी तेथुन भरधाव वेगात सोलापुर रस्त्याने पुण्याच्या दिशेने घेवुन जात असताना त्यांनी दोन चार चाकी वाहनामधुन आमच्या गाडीचा पाठलाग केला. गाडी थांबवित नाही. म्हणुन त्यांनी गाडीवर फायरिंग करून रस्त्यात गाडी अडविली. त्यानंतर गाडी मधुन चौघे उतरले. त्यांनी मला व विजयभाई यांना हाताने मारहाण केली. त्यावेळी गाडीमध्ये दोघेजण बसलेले होते. आम्हाला मारहाण करून त्यांनी आमच्या गाडीतील ३ कोटी ,६०,लाख रू रोख रक्कम व १४ हजाराचे दोन १२ हजाराचा एक मोबाईल असे एकुण ३ कोटी ६० लाख,२६, हजार रुपये किमतीचा माल जबरदस्तीने चोरून नेला.