पुणे- शहरातील कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा वाढत चालला आहे. पुण्यात करोनाबाधित असलेल्या 3 नागरिकांचा मंगळवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या तिघांचेही वय हे 60 वर्षापुढील असून त्यापैकी दोघांना किडनी, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होत होता. त्यामुळे पुण्यातील कोरोना बाधित मृतांचा आकडा 8 वर गेला आहे.
Coronavirus : पुण्यात आणखी 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू, मृतांचा आकडा 8 वर - Pune latest news
करोना बाधित असलेल्या 3 नागरिकांचा मंगळवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या तिघांचेही वय हे 60 वर्षापुढील असून त्यापैकी दोघांना किडनी, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होत होता.
![Coronavirus : पुण्यात आणखी 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू, मृतांचा आकडा 8 वर Pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6697859-thumbnail-3x2-mum.jpg)
पुण्यात आणखी 3 कोरोना बाधितांचा मृत्यू
दरम्यान, आज महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे 23 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 891 वर पोहोचला आहे. यात राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत 24 तासांत 10 रुग्णांची वाढ झाली आहे.
Last Updated : Apr 7, 2020, 4:34 PM IST