पुणे:महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) व महराष्ट्र राज्य महिला आयोगाने (State Womens Commission) या अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना आवाहन केले आहे. त्याला महाराष्ट्रभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने पुण्यातील खडकवासला मतदारसंघातील धायरीसह तब्बल २९ ग्रामपंचायतींनी व ४ प्रभागातील नागरिकांनी उद्या दि.९ जून रोजी एकाच दिवशी हा ठराव मंजूर करण्याचे ठरवले आहे. अशा पद्धतीने खडकवासला मतदारसंघ हा महाराष्ट्रातील पहिला मतदारसंघ असेल जो १०० टक्के विधवा प्रथा बंदी करणारा मतदारसंघ ठरेल.
Against Widow Tradition: 29 ग्रामपंचायती विधवा परंपरेविरोधात एकाच दिवशी ठराव घेणार - राज्य महिला आयोग
पुणे जिल्ह्यात 29 ग्राम पंचायती (29-gram panchayats) विधवा परंपरेविरुध्द एकाच दिवशी ठराव घेणार ( hold resolution against widow Tradition ) आहेत एकविसाव्या शतकात वावरतना समाजात विधवा प्रथेसारख्या अनिष्ट प्रथा प्रचलित आहेत. पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसणे, मंगळसुत्र तोडणे, बांगड्या फोडणे, जोडवी काढणे यासारख्या कुप्रथांचा त्यात समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यात या प्रथा मोडुन काढण्यासाठी (Against Widow Tradition) अनेक ग्राम पंचायतींनी पुढाकार घेतला आहे.
मध्यतंरी रुपाली चाकणकर यांच्या काकांचे निधन झाल्यानंतर त्यांनी आपल्या काकूचे कुंकू न पुसता, मंगळसुत्र न काढता विधवा प्रथा बंदीची सुरुवात आपल्या घरापासून केली. आता याच्याही पुढे जात आपला संपूर्ण मतदारसंघ विधवा प्रथामुक्त त्या करत आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी-शर्मा, पुण्याचे जिल्हाधिकारी श्री.राजेश देशमुख, मनपा आयुक्त श्री.विक्रम कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त श्री.अमिताभ गुप्ता, पोलीस अधीक्षक श्री.अभिनव देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.