महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात दिवसभरात कोरोनाचे 271 नवे रुग्ण, तर 6 जणांचा बळी - पुणे कोरोना रूग्ण न्यूज

पुण्यात आज कोरोनाचे 271 नवीन रूग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील एकूण मृतांची संख्या 314 वर गेली आहे. आज 138 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत एकूण 6 हजार 472 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून यातील 3 हजार 782 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह
corona positive

By

Published : May 31, 2020, 9:09 PM IST

पुणे - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. आज कोरोनाचे 271 नवीन रूग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील एकूण मृतांची संख्या 314 वर गेली आहे. आज 138 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 173 रूग्ण गंभीर असून यातील 42 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

आत्तापर्यंत एकूण 6 हजार 472 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 3 हजार 782 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयात 2 हजार 376 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण सापडले आहेत. दाट झोपडपट्टी असलेल्या भागात कोरोनाचे रूग्ण सापडण्याची संख्या मोठी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details