पिंपरी-चिंचवड (पुणे)- शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यांतही कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. बुधवारी (दि. 8 जुलै) दिवसभरात 27 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. यात दोन पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयातील बाधित पोलिसांची एकूण संख्या 95 वर पोहचली असून त्यापैकी 31 जण बरे झाले आहेत. तर 64 बाधित पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.