बारामती - शहर पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांनाच धक्काबुक्की केल्याप्रकरणी, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील २७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी निकम यांनी फिर्याद दिली.
अशी आहे घटना..
बारामती शहरात काल रात्री आठच्या सुमारास शेख व बागवान या दोन गटात हाणामारी झाली होती. हाणामारीनंतर हे दोन्ही गट फिर्याद देण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात आले होते. दरम्यान, एका गटाने बेकायदेशीर जमाव जमवत हातात दगडे घेऊन दहशत निर्माण करत "तैनूर शेख व कैश शेख यांना आमच्या ताब्यात द्या; त्यांच्याकडे आम्ही बघतो" असे म्हणत पोलिसांना धक्काबुक्की केली. तसेच जिल्हाधिकार्यांनी जारी केलेल्या आदेशाचा भंग करून सोशल डिस्टन्सिंग न पळता, विनामास्क गर्दी जमवून सरकारी कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. सदर इसमांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास पो.स.ई. जाधव करीत आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांची नावे..
अल्ताफ बागवान, वसीम उर्फ घोडा बागवान, मार्टिन उर्फ शाहिद मुसा बागवान, सलमान अल्ताफ बागवान, सोहेल अल्ताफ बागवान, अरबाज अल्ताफ बागवान, अबरार आसिफ बागवान, शाहिद बागवान, उमेद अल्ताफ बागवान, अमजद बागवान, सलीम जाफर बागवान, मुक्तार बागवान, मेहर मन्सूर बागवान, मंट्या मन्सूर बागवान, माप्या निसार बागवान, फहीम सलीम बागवान, हसन अल्ताफ बागवान, जहीर बागवान, दिशांत बागवान, शहाबाद आसिफ बागवान, टिपू आसिफ बागवान, आसिफ जाफर बागवान, फय्याज मोहम्मद बागवान, सादिक उस्मान दलाल बागवान, फिरोज अजिज बागवान, मोसिम बागवान, तनवीर बागवान (सर्व राहणार बारामती ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.