लोणावळा -ओबीसी समाजाच्या राज्यस्तरीय चिंतन शिबिराला पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. यात केवळ पंचवीस व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी दिलेली आहे. सर्वसामान्यांनासाठीचे नियम लोकप्रतिनिधींनी पाळावेत, असेही पोलिसांनी नोटीसीद्वारे कळवले आहे.
26 आणि 27 जून असे दोन दिवसीय हे चिंतन शिबिर असून, सर्व पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या शिबीराच्या उद्घाटन समारंभाला मंत्री छगन भुजबळ, मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह माजी मंत्री, विद्यमान आमदार असे अकरा मान्यवर हजेरी लावणार आहेत. तर समारोपाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री पंकजा मुंडेंसह आजी-माजी मंत्री, विद्यमान आमदार असे आठ मान्यवर उपस्थित राहतील.
लोणावळ्यातील ओबीसी समाजाच्या चिंतन शिबिराला 25 जणांची उपस्थिती - ओबीसी अारक्षण
26 आणि 27 जून असे दोन दिवसीय हे चिंतन शिबिर असून, सर्व पक्षीय नेते उपस्थिती लावणार आहेत. या शिबीराच्या उद्घाटन समारंभाला मंत्री छगन भुजबळ, मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह माजी मंत्री, विद्यमान आमदार असे अकरा मान्यवर हजेरी लावणार आहेत.
अद्याप लोणावळ्यातील पर्यटनबंदीही कायम आहे. येणाऱ्या पर्यटकांना पोलीस हुसकावून लावत आहेत. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असणारे छोटे-मोठे व्यापारी नाराज आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींना मुभा देता येणार नाही. पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला झालेली गर्दीचं उदाहरण अगदी ताजे असताना परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी नोटीस धाडली आहे. पंचवीस व्यक्तींपेक्षा जास्त हजेरी असल्यास, कारवाई करणार असल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले.
हेही वाचा -शिर्डीत दुहेरी हत्याकांड; शेतकरी कुटुंबातील पती-पत्नीची निर्घृण हत्या