महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात अनलॉकला सुरुवात; आजपासून शहरात 25 टक्के पीएमपीएमएल बसेस धावणार - PMPML bus pune news

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरात मार्च एप्रिल महिन्यात पून्हा निर्बंध लावण्यात आले. त्या निर्बंधात पीएमपीएमएल देखील बंद करण्यात आली. त्यानंतर राज्यात कोरोनाचे रुग्ण जस जसे कमी होत गेले तस तसे निर्बंध शिथिल करण्यात आले.

पुण्यात अनलॉकला सुरुवा
पुण्यात अनलॉकला सुरुवा

By

Published : Jun 7, 2021, 12:24 PM IST

Updated : Jun 7, 2021, 1:15 PM IST

पुणे- मिशन बिगेन अंतर्गत पुण्यात महापालिकेच्यावतीने आजपासून काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. यात 25 टक्के सार्वजनिक वाहतूक असलेली पीएमपीएमएल सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार पीएमपीएमएल तीन एप्रिलपासून बंद होती. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच पीएमपीएमल सुरू होती. राज्यासह शहरात कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर हळूहळू निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात 13 आगारांमध्ये 169 मार्गावर 416 बसचे नियोजन करण्यात आले.

पुण्यात अनलॉकला सुरुवात
दोन महिन्याहून अधिक काळापासून बंद होती पीएमपीएमएलकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरात मार्च एप्रिल महिन्यात पून्हा निर्बंध लावण्यात आले. त्या निर्बंधात पीएमपीएमएल देखील बंद करण्यात आली. त्यानंतर राज्यात कोरोनाचे रुग्ण जस जसे कमी होत गेले तस तसे निर्बंध शिथिल करण्यात आले. राज्य सरकारच्यावतीने जिल्ह्यातील पॉझिटिव्ही रेट आणि ऑक्ससीजन बेडची उपलब्धतेनुसार जिल्ह्यांची वर्गवारी करून निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यात पूणे जिल्हा चौथ्या स्थरावर असल्याने शहरात 25 टक्केच पीएमपीएमएल सुरू करण्यात आली आहे.नियमांचे पालन करूनच प्रवाश्यांना बसमध्ये प्रवेशलॉकडाऊनमुळे पीएमपीपुढे आर्थिक संकट निर्माण झालेले असताना नव्या आदेशानुसार बससेवा 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सुरवातीला बसला सॅनिटायझेशन करून घेणे आणि मगच त्यांनतर प्रवाश्यांना बसमध्ये बसवण्यात येत आहे. एक सीटवर एकच प्रवासी बसणार आहे. कोरोनाच्या सर्व नियमाचे पालन करूनच ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. शहरातील सर्वच मार्गावर 400 पेक्षा अधिक बसेस सुरू करण्यात आले. विना मास्क बसमध्ये प्रवेश देण्यात येत नाहीये. त्याचप्रमाणे ज्या मार्गावर बस एकदा जाऊन आली की पुन्हा बसला सॅनिटायझेशन करून मगच प्रवाश्यांना बसमध्ये बसवण्यात येत आहे.
Last Updated : Jun 7, 2021, 1:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details