पुणे- येथील जम्बो कोविड रुग्णालयातील 25 कर्मचाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिला आहेत. यामध्ये 15 डॉक्टर आणि 10 परिचारिकांचा समावेश आहे. राजीनामा का दिला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पुण्यातील हे जम्बो कोविड रुग्णालय सुरू झाल्यापासून सातत्याने चर्चेत आहे. या ठिकाणी रूग्णांवर उपचार होत नसल्याचा आरोप करण्यात येतो. हे रुग्णालय चालवण्यासाठी पुरेसे डॉक्टर ही उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत 25 कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्याने या रुग्णालयात पुढील अडचणी आणखी वाढल्या आहेत.
पुण्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने हे जम्बो रुग्णालय तयार करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तब्बल 80 कोटींहून अधिक खर्च आला आहे. पण, हे रुग्णालय सुरू झाल्यापासून सातत्याने तक्रारी वाढत आहेत. रुग्णालयात पुरेसे डॉक्टर नसल्याने रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत त्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाल्यानंतर हा मुद्दा प्रकर्षाने समोर येत आहे.
पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे या रुग्णालयात 800 खाटांची क्षमता असतानाही सध्या 330 खाटा उपलब्ध आहेत. त्यामुळे 'जम्बो'बाबत हलगर्जीपणा करुन खोटी माहिती देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली. त्यामुळे आता पंचवीस कर्मचाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्यामुळे या रुग्णालयासमोरील अडचणीत आणखीनच भर पडली आहे.
पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालयातील 25 कर्मचाऱ्यांचा सामूहिक राजीनामे
पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालयातील 25 वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. यामुळे या रुग्णालयातील रुग्णांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
जम्बो रुग्णालय