पुणे - शहरातील मुख्य आयटी हब असणाऱ्या हिंजवडीतून अंमली पदार्थ विरोधी पथकाने 6 लाख 40 किंमतीचा 25 किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी योगेश्वर गजानन फाटे (वय - 23) या तरुणाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथक अधिक तपास करत आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी शाकिर जिनेडी आणि संदीप पाटील यांना एक व्यक्ती गांजा विक्री करण्यासाठी हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्क फेज दोन भागात येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून अंमली पदार्थ विरोधी पथकाने या परिसरात सापळा लावला. आरोपी योगेश्वर फाटे हा कंपनीच्या संरक्षक भिंतीजवळ आला. यावेळी पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. त्याची झडती घेतल्यानंतर बॅगेत 6 लाख 40 हजारांचा 25 किलो 606 ग्रॅम गांजा आढळला. त्याने हा गांजा विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.
'आयटी हब' हिंजवडीत 25 किलो गांजा जप्त; अंमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई - hinjewadi police
पुण्यातील आयटी हब अशी ओळख असणाऱ्या हिंजवडीत 25 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी 23 वर्षांच्या तरुणाला अटक झाली आहे.
!['आयटी हब' हिंजवडीत 25 किलो गांजा जप्त; अंमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई pune crime news](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8918456-1054-8918456-1600933272899.jpg)
'आयटी हब' हिंजवडीत 25 किलो गांजा जप्त; अंमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, सहाय्यक पोलीस फौजदार शाकीर जिनेडी, पोलीस हवालदार राजन महाडीक, प्रदीप शेलार, राजेंद्र बांबळे आणि अन्य कर्मचाऱ्यांनी संबंधित कारवाई केली.